मंगळ मंगल आहे

मंगळ - मंगल आहे.             तरीही विवाह जमवण्यातील अडथळा अज्ञानाने ठरतोय साप समजून दोरी धोपटणे असा प्रकार सर्रासपणे दिसून येतो. निमहकीम खतरे जान या म्हणीप्रमाणे अर्धवट ज्ञान हे विनाशाला कारण असते.             विवाहोत्सूक वधु-वरांचे आई वडिल पालक मंगळाचा बागुलबुवा करतात. एखाद्याला मंगळ आहे ह्याची पडताळणी स्वत:च करतात. करणे चुक नाही पण त्याचे योग्य ज्ञान घ्या व मग करा.             दूसरा भाग मंगळी पत्रिकेला मंगळीच पत्रिका लागते असे ही नाही एक पत्रिका मंगळी असल्यास दुसऱ्या पत्रिकेतील ग्रहस्थिती जर पुरक असेल तर विवाह जमवता येतो. यासाठी फक्त मंगळी पत्रिका अशा पत्रिकेशी जुळते ज्या मध्ये पत्रिका मंगळी नसली तरी चालेल पण त्या दुसऱ्या पत्रिकेत शनि 1-4-7-8-12-29 स्थानी असावा किंवा गुरु/शुक्र/चंद्राची दृष्टी सप्तम स्थानावर असावी. तसेच ज्या पत्रिकेत मंगळ 1-4-7-8-12 या स्थानी असेल पण तो प्रथमात मेषेचा/चतुर्थात वृश्चिकेचा /सप्तमात मकरेचा / अष्टमात सिंहेचा/ द्वादशात धनु राशीचा असल्यास ती पत्रिका मंगळी नसते. तसेच जर मंगळ मिथून / कन्या राशीत असल्यास  मंगळ दोष नसतो.             जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती मंगळीच असतात. त्यामुळे मंगळी पत्रिका ही श्रेष्ठ पत्रिका असते हे ही विसरु नये.             दुसरा मुद्दा नाडी दोषाचा. एक नाड येत असली तरी त्या पत्रिकेचा सुक्ष्म अभ्यास केल्यास जर नक्षत्रांच्या/ त्यांच्या चरणांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्यातुन नाडी दोष खरेच आहे का? अन्यथा वर वर दिसणारा नाडी दोष प्रत्यक्षात नसतोच हे ही दिसून येते. तरी नाडी दोषामुळे पत्रिका / स्थळ टाळण्याआधी त्याचा सुक्ष्म अभ्यास उच्च शिक्षित ज्योतिषाकडुन पडताळणी आवश्यक ठरते. याचे भान प्रत्येकाने ठेवावे. \"शुभंभवतू\" ज्योतिष्यशास्त्री - प्रमोद सुलाखे B.E.(Civil) ज्योतिष्टशास्त्री - सौ. छाया सुलाखे (D.M.)   M.A.Vedang Jyotishi   Diploma in Vastu Shastra  9028510765 / 9881734582 / 9763301953  pramodsulakhe52@gmail.com  www.sulakheastrology.com Discount 500.for details consultancy